Sunday, July 12, 2015

कराड नगरपरिषद, शाळा क्र. ३

# शाळेचे नाव आणि पत्ता - कराड नगरपरिषद, शाळा क्र. ३, कराड, जि. सातारा

# शाळेबद्दल थोडक्यात - आधुनिक महाराष्ट्राचे जनक, मा. श्री. यशवंतराव चव्हाण, यांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि कोयना-कृष्णा नदीच्या संगमावर वसलेल्या कराड शहराची ओळख साता समुद्रापार ज्या कुस्तीगीराने पोहोचवली, त्या श्री. खाशाबा जाधव यांचे गाव. या गावाने अनेक दिग्गज घडवले असून इथेच नगर पालिकेच्या शाळेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण देखील घडले आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेले कराड शहर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे.

# शाळेची स्थापना - १९६७

# शाळेचे ब्रीद - ध्यास गुणवत्तेचा

# शाळेचा पट -

एकूण - ५५८

१. पहिली - १२०
२. दुसरी - ९०
३. तिसरी - १००
४. चौथी - ९३
५. पाचवी - ७५
६. सहावी - ४५
७. सातवी - ३५
# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
१. शिष्यवृत्ती परीक्षा - ३ वर्षात ३० मुले गुणवत्ता यादीत, २२ मुले विविध स्पर्धा परीक्षेत राज्य पातळीवर
२. बाजार
३. गीतमंच
४. वक्तृत्व स्पर्धा
५. पालकांसाठी विविध स्पर्धा
६. गुणवंत विद्यार्थी सत्कार
७. सामुदायिक कवायत
८. वृक्षारोपण
९. राष्ट्रीय कार्यक्रम
१०. विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक
११. गणपती उत्सव
१२. दही हंडी
१३. पालक सभा
१४. शिक्षक-विद्यार्थी वाढदिवस

# शाळेबद्दल अजून काही -
१. माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे कडून शाळेला १४ लाखांचे बक्षीस
२. शिक्षण उपसंचालक गोंधळी साहेब यांच्या कडून शाब्बासकी
३. माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती
४. शाळेला cctv कॅमेरे, स्कूल बस सारख्या सुविधा आहेत.

# शिक्षकवृंद
१. अर्जुन कोळी - मुख्याध्यापक [आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित]
२. सुमन यादव
३. उर्मिला माने
४. मधुमालती भगत
५. सुशीला जाधव
६. शैलजा गुरव
७. संग्राम गाढवे
८. दयानंद माने
९. रोहिणी देसाई
१०. हेमा कांबळे
११. सुवर्णा चव्हाण
१२. आरती साठे
१३. प्रियांका धुमाळ
१४. आशा पवार
१५. रुपाली पाटील - संगणक शिक्षिका
१६. अभिजित भोपते - संगीत शिक्षक
सर्व शिक्षक पदवीधर आहेत

==============================

# आपल्या शाळा आपले वैभव, हे वैभव असेच टिकावे म्हणून मुलांना मराठी शाळेत शिकवा,
# मातृभाषेतून शिक्षणाशिवाय अन्य कोणत्याही भाषेतील शिक्षण बालकांवर ओझेच होय - यशपाल समिती भारत सरकार
# मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत

==============================
शाळेचे फोटो :-

































































No comments:

Post a Comment